इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने
पैनगंगा
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत
हिंगोली (जिमाका), दि. 27 : पैनगंगा नदीवरील इसापूर
धरण दि. 26 ऑगस्ट, 2021 पर्यंत 80.41 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 438.92 मीटर
आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा
येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर
धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दि. 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत 440.82 मीटर ठेवावी
लागणार आहे. धर सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी
धरणात येणारे अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात
सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन
पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाव्य पुराच्या पाण्यामुळे
जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी
सुरक्षित स्थळी राहावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग
क्र. 1, नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment