जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
जिल्हाधिकारी व विविध कार्यालयांना भेटी
हिंगोली,
दि. 24 (जिमाका) :
येथील जिल्हाधिकारी कार्यालय व विविध विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली . यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यालयातील उपस्थित
व अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पाहणी केली व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तेथील कामकाजाची
माहिती घेतली . तसेच कार्यालयात स्वच्छता व फाईल मांडणी कशी ठेवावी याबाबत सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हाधिकारी
यांचे स्वीय सहायक नागेश बोलके उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment