महात्मा ज्योतीराव फुले
व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे
पालकमंत्री प्रा. वर्षा
गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 13 :
येथील लक्ष्मी लाईफकेअर रुग्णालयात
पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य
योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,
उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते,
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा
समन्वयक डॉ. मोहसीन, रमेशचंद्र बगडिया, हनुमानदासजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी हिंगोली सारख्या
शहरातून तरुण पिढीतील डॉक्टरांनी एक चांगल्या सुविधा असलेले रुग्णालय स्थापन केले
आहे, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या रुग्णालयातून महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य
योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, अशा
सदिच्छा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स,
नर्स व सर्व स्टॉफ उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment