30 July, 2016

जिल्हयातील अनुसूचित  जातीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

हिंगोली, दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांचेवतीने सन 2015-16 मध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 85% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता सोमवार दि. 01 ऑगस्ट, 2016 रोजी  दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांचे अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांचे प्रमुख उपस्थितीत  करियर मार्गदर्शन  मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
 सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पुर्व बाजुस, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सदर करियर मार्गदर्शन मेळाव्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली  यांनी  केले आहे.
***** 


अनुज्ञप्त्या एक महिन्याकरिता निलंबित

हिंगोली, दि. 30 :-  मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (क) अन्वये शासन दरापेक्षा जास्त दराने मद्य विक्री करीत असलेल्या खालील अनुज्ञप्त्या देशी दारु किरकोळ विक्री दुकाने व बीयर शॉपी एक महिन्याकरिता जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी निलंबीत केल्या आहेत.
देशी दारु किरकोळ विक्री दुकान :- 1) सौ. कविता मनोज गुप्ता, सी.एल.-3 अनुज्ञप्तीधारक मौ. हिंगोली , 2) श्रीमती अन्नपूर्णाबाई पाराजी परडे व भागीदार सीलएल-3 अनुज्ञप्तीधारक मौ. कौठा रोड, वसमत 3) श्रीमती मालाबाई सिताराम जैस्वाल, सीएल-3 अनुज्ञप्तीधारक मौ. पुसेगांव ता. सेनगाव, 4) श्री. पी. एन. चव्हाण व भागीदार सीएल-3 अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत ता. वसमत .
बीयर शॉपी :- 1) श्री. गोपाल अप्पाराव बोरकर, एलएलबीआर-2 अनुज्ञप्तीधारक, कळमनुरी 2) श्री. गंगाधर पारुसा जिमल्ले, एफएलबीआ-2, अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत 3) श्री. कृष्णा गौड बालागौड लिंगाला, एफएलबीआर-2, अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत. या अनुज्ञप्त्या एक महिन्याकरिता निलंबीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.

***** 
प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

हिंगोली, दि. 30 :-  खरीप हंगाम 2016 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत खरीप हंगामाकरिता शेतकरी सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै, 2016 अशी होती. परंतु प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2016 या योजनेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता  यावे, याकरिता मुदत वाढवून दिनांक 2 ऑगस्ट, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कृषी आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा सरंक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजिकच्या विभागीय कृषि सह.संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****  
नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 - अ क्षेत्रात निवडणूक आचार संहिता लागू
हिंगोली, दि. 30 :-  राज्याचे निवडणूक आयोग यांनी जिल्ह्यातील कळमनुरी या नगर परिषदेची पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. सदर पोट निवडणूक कार्यक्रमानुसार नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3-अ क्षेत्रात दिनांक 29 जुलै, 2016 च्या मध्यरात्रीच्या 12-00 वाजल्यापासून निवडणूक आचार संहिता लागू झाली आहे. ही आचार संहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. सदर आचार संहितेच्या सर्वतोपरी पालन होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.

***** 
कळमनुरी नगर परिषद पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर

हिंगोली, दि. 30 :-  राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 29 जूलै, 2016 च्या पत्रानुसार कळमनुरी नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 3-अ रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम ऑगस्ट 2016 जाहीर करण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे राहील.
जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची सोमवार, दिनांक 1 ऑगस्ट, 2016 , नामनिर्देशनपत्रे देणे व स्विकारणे गुरुवार,दिनांक 4 ऑगस्ट, 2016 ते गुरुवार,दिनांक 11 ऑगस्ट, 2016 सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 पर्यंत) दिनांक 7 ऑगस्ट, 2016 चा रविवार या दिवशी नामनिर्देशनपत्र देण्यात व स्विकारली जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याची अंतिम तारीख गुरुवार, दिनांक 11 ऑगस्ट, 2016 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत असणार आहे. नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची शुक्रवार, दिनांक 12 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 11-00 वाजेपासून यादी प्रसिध्द करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचे अंतिम दिनांक अपील नसेल तेथे गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2016 रोजी दुपारी 3-00 वाजेपर्यंत असणार आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी असेल. मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्याची व जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय मतदान यादी शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट, 2016 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. मतदानाचा दिनांक रविवार, दिनांक 28 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 7-30 ते सांयकाळी 5-30 वाजता या कालावधीत होणार आहे. तर सोमवार, दिनांक 29 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 10-00 वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजीपर्यंत महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.

*****
राष्ट्रीय पशुधन विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 30 :- राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन  विमा योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालु आहे या योजनेची प्रभावीपणे अंमबजावणी होण्याच्या दुष्टीने दि. 1 ऑगस्ट, 2016 ते 15.8.2016 च्या दरम्यान खालील प्रमाणे  आयोजन केले आहे.
सदर शिबीराचे आयोजन तालुक्यानिहाय पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. यात हिंगोली तालुक्यातील हिंगोली येथे दि. 1 ऑगस्ट, 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि. 4 ऑगस्ट, 2016 रोजी नर्सी नामदेव,  दि. 8 ऑगस्ट, 2016 रोजी सिरसम. वसमत तालुक्यातील कुरुंदा, आरळ, टेभुर्नी, पळसगांव येथे दि. 2 ऑगस्ट, 2016 शिबीराचे आयोजन होणार आहे. तर दि. 5 ऑगस्ट, 2016 रोजी बोराळा, हट्टा, आडगांव, शिरळी, वाई. दि. 12 ऑगस्ट, 2016  सातेफळ, खांडेगांव, गिरगांव. दि. 15 ऑगस्ट, 2016 आंबा, धामगांव, वाखारी, हयातनगर, पळशी. कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे दि. 3 ऑगस्ट, 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि. 6 ऑगस्ट, 2016  कळमनुरी. दि. 10 ऑगस्ट, 2016  रोजी आखाडा बाळापुर व दि. 13 ऑगस्ट, 2016 रोजी रामेश्वर तांडा याठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगांव सोळके येथे दि. 7 ऑगस्ट, 2016 रोजी तर दि. 11 ऑगस्ट, 2016 रोजी जवळा बाजार येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि सेनगाव तालुक्यातील सेनगांव येथे दि. 9 ऑगस्ट, 2016 रोजी तर  दि. 14 ऑगस्ट, 2016 रोजी आजेगांव येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
                या योजनेंतर्गत गाय, म्हैस, देशी/संकरीत दुभती जनावरे आणि शेळी, मेंढी, डुकरे, ससे, एडका इत्यादी तसेच बैल, घोडे, गाढव, खेचर, उंट, इत्यादी ओझेवाहु जनावरांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक घरातील लाभार्थ्याला 5 पशुधन युनिट (5पशु/50 शेळया, मेढया, ससे इ.) पर्यत मर्यादित आहे.
        विम्याचे संरक्षण पॉलिसी कालावधीत पशुधनाचा मृत्यु हा आजारपण, अपघात, आग, विज पडणे, पुर, वादळ, भुकंप, दुष्काळामुळे   झाल्यास नुकसान भरपाई मिळेल. पशुधनाच्या कायमच्या संपुर्ण अपंगत्वासाठी विमा संरक्षण पाहिजे असल्यास प्रतिवर्षी 10 टक्के ज्यादा दराने विमा हप्ता आकारला जाईल.
        पशु मुल्यमापन पशुधनाचे मुल्य सामान्यपणे गायीसाठी रु.3 हजार/प्रती लिटर/ प्रती दिवस तर म्हशीसाठी रु.4 हजार प्रती लिटर/प्रती दिवस विचारात घेऊन ठरविण्यात येईल आणि अन्य प्रकारच्या पशुधन मुल्यमापनासाठी पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्र वरून ग्राहय धरले जाईल.
                एक वर्षाकरिता रु. 2.45 टक्के तर 3 वर्षाकरिता 6.40 टक्के या विमा हप्त्या दराने दारिद्रय रेषेवरील ( एपीएल ) लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान असणार आहे. तर दारिद्रय रेषेखालील अ.जा./अ.ज.जा.लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदान असणार आहे.
                विमा कृत पशुधनाची ओळख म्हणुन त्यांच्या कानात 12 अंकी ओळख क्रमांकाचा बिल्ला बसवला जाणार आहे. ज्या जनावरांना पुर्वीचा बिल्ला मारलेला असल्यास तो ओळख क्रंमाक म्हणुन वापरण्यात येणार आहे.
          विमा प्रस्ताव देतांना प्रस्ताव पत्रासोबत शासकीय पशुवैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, जनावरांचा मालक व बिल्ला असलेला फोटो तसेच विमा धारकाचा मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.
        विमा दाव्याच्या संदर्भात जनावराचा मृत्यु झाल्यास विमा दाव्याची रक्कम विमा रक्कमे एवढी असेल तर कायमच्या संपुर्ण अपंगत्वाच्या प्रकरणात विमा रक्कमेच्या 75 टक्के एवढी असेल. दावा नोंदविण्यासाठी न्यु इंडिया इंश्योरन्स कंपनी लि. ने उपलब्ध करुन दिलेल्या टोल फ्री क्रमांक 1800 209 1415 यावर जनावराच्या मृत्यु बाबतची प्रथम सुचना जनावरांच्या मालकाने 24 तासाचे आत देणे आवश्यक आहे. दावा निकाली काढण्यासाठी दावा फॉर्म, विमा पॉलिसीची प्रत, शवविच्छेदनाचा अहवाल, कानातला बिल्ला आणि बॅंक खात्याच्या सविस्तर माहितीसह कागदपत्र देणे आवश्यक आहेत. सदरची योजना केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यान्वित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयच्या पत्यावर संपर्क साधावा - दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.मायक्रो ऑफीस, चैाधरी कॉम्लेक्स, अग्रसेन चौका जवळ, हिंगोली व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत संपर्क करावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.68 मि.मी. पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस सेनगाव तालुक्यात
          हिंगोली, दि.30 :- जिल्ह्यात शनिवार दिनांक 30 जुलै 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 23.38 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  4.68  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 504.20 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 56.63 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  शनिवार 30 जुलै, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली- 3.43 (487.57), वसमत 8.29 (514.96), कळमनुरी – 2.83 (559.15), औंढा नागनाथ – निरंक  (514.50) , सेनगांव 8.83 (444.81). आज  अखेर  पावसाची सरासरी 504.20.

*****
जिल्हयातील अनुसूचित  जातीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

हिंगोली, दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांचेवतीने सन 2015-16 मध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 85% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता सोमवार दि. 01 ऑगस्ट, 2016 रोजी  दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांचे अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांचे प्रमुख उपस्थितीत  करियर मार्गदर्शन  मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
 सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पुर्व बाजुस, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सदर करियर मार्गदर्शन मेळाव्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली  यांनी  केले आहे.
***** 


29 July, 2016

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.27 मि.मी. पावसाची नोंद
          हिंगोली, दि.29 :- जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 29 जुलै 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 6.33 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  1.27  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 499.52 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 56.10 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  शुक्रवार 29 जुलै, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली- 0.71 (484.14), वसमत 0.29 (506.67), कळमनुरी – 4.00 (556.32), औंढा नागनाथ – निरंक  (514.50) , सेनगांव 1.33 (435.98). आज  अखेर  पावसाची सरासरी 499.52.

*****
अप्रमाणित खताची विक्री
          हिंगोली, दि.29 :- कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडून मे. मातेश्वरी अग्रो केमीकल्स, खांडेगाव ता. वसमत जि. हिंगोली ह्या कंपनीकडील दुय्यम अन्नद्रव्य मिश्रखत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ग्रेड (10:05:10) ह्या खताचा अप्रमाणित साठा 316 मेट्रिक टन जप्त केलाअसून मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या आदेशानुसार जप्त केलेल्या दुय्यम अन्नद्रव्ये रासायनिक खताची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने दुय्यम अन्नद्रव्य खत उत्पादक परवानाधारक कंपनीस कच्चा माल म्हणून विक्री करावयाची आहे.
                त्या अनुषंगाने कृषि आयुक्तालय, पुणे यांनी सर्वसाधारण प्रति बॅग कमाल किंमत रुपये 173 निश्चित केलेली आहे. तरी परवानाधारक दुय्यम अन्नद्रव्य खत उत्पादक कंपनीचे मालक / व्यवस्थापक ह्यांनी कृषि विभाग, जिल्हा परिषद, बातमी प्रसिध्द झाल्यापासून आठ दिवसाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहित नमुना (अटी व शर्ती सह) कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयात उपलब्ध आहे.
                अधिक माहितीसाठी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे
   --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि.29 :-  प्रधानमंत्री  पिक  विमा  योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बँकाना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधीत विमा कंपनीचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन दि. 31 जुलै, 2016 पर्यंत बँकांना व शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात येणा-या अडचणी सोडवून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करुन घेण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहे.
प्रधानमंञी  पिक  विमा  योजनेबाबत जिल्ह्यातील शेतक-यांना व बँकाना येणा-या अडचणीबाबत जिल्हाधिकारी यांनी इफको टोकियो जनरल ईन्शुरन्स कंपनी, अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, कृषि विभाग यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांना विमा कंपनीनेही  विमा प्रस्ताव उपलब्ध करुन दिलेले आहेत. परंतु कृषि विभागाने पूरवठा केलेले विमा प्रस्ताव (फॅार्म) देखील त्यांना वापरता येणार आहे. तसेच प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रस्ताव भरण्याची गरज नाही. एका शेतक-यास एका महसूल मंडळासाठी सर्व पिकासाठी एकच फॅार्म चालेल. प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र फॅार्म भरण्याची गरज नाही. पिक कर्ज घेतलेल्या शेतक-यांनी त्यांचा पिक विमा त्या बँकेमार्फतच भरण्याचे बंधनकारक आहे. मात्र               शेतक-यांनी सदर बँकेस संपर्क करुन आपला पिक विमा भरल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. एखाद्या शेतक-याने एका पिकासाठी कर्ज घेतले मात्र प्रत्यक्षात दुस-याच पिकाची लागवड केली असल्यास अशा शेतक-याने बँकेस पीक बदल केल्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून त्याची पोच घ्यावी तसेच उर्वरित विमा हप्ता बँकेत भरावा. अन्यथा ज्या क्षेत्रासाठी व पिकासाठी पीक कर्ज घेतले आहे ते क्षेत्र वगळुन उर्वरित क्षेञाचा पीकविमा बिगर कर्जदार शेतकरी म्हणुन स्वतंत्रपणे वेगळा भरावा. थकबाकीदार (NPA) शेतक-यांचा पिक विमा बिगर कर्जदार म्हणुन संबंधित बँकानी भरुन घ्यावा, असे ही निर्देश यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी संबंधीतांना दिले. दत्तक बँकेतच विमा भरण्याची कोणतीही अट नसून शेतक-यांचे हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या बँकेत बचत खाते आहे त्या बँकेत ते पिक विमा भरु शकतात. शेतकऱ्यांनी स्वघोषित केलेला पिक पेरा चालेल मात्र त्यावर संबधीत तलाठ्याची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी श्री. भंडारी यावेळी म्हणाले.

*****

28 July, 2016

नारी शक्ती पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 28 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय स्तरावर नारी शक्ती पुरस्कार सन 2016 या वर्षासाठी प्रदान करण्यासाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तसेच केंद्र शासनामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी स्वयंसेवी संस्थांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असणार आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 10 ऑगस्ट, 2016 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 07 हिंगोली येथे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. ए. कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 च्या 4-ए मधील तरतुदीनुसार जाहिरातीवर प्रतिबंध
हिंगोली, दि. 28 :- हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 च्या कलम 4 – ए मधील तरतुदींचा भंग करणाऱ्या वृत्तपत्र आणि वेबसाईडवर प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीबाबत त्वरित प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहे.
त्यानुसार जर कोणी व्यक्ती वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीव्दारे, पाक्षिक, मासिक किंवा इतर कोणत्याही माध्यमाव्दारे संपत्तीमध्ये हिस्सा किंवा पैसा देणे बाबत किंवा दोन्ही बाबी किंवा दोन्ही बाबी किंवा इतर हक्काबाबत स्वत:च्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा नातेवाईकाच्या लग्नाचा मोबदला म्हणुन देण्याचे आवाहन करीत असेल जो कोणी व्यक्ती उपकलम (ए) मध्ये संदर्भाकिंत मजकुराच्या जाहिरातीचे छपाई करेल, प्रकाशित करेल, वितरीत करेल त्यास सहा (06) महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु जास्तीत जास्त पाच (05) वर्षे कैदेची शिक्षा व रुपये 15 हजार एवढी दंड शिक्षेस पात्र असेल परंतु न्यायनिवाड्यातील पुरेशा व विशेष कारणास्तव सहा (06) महिन्यापेक्षा कमी नसेल एवढी कैदेच्या शिक्षेस पात्र ठरेल.

*****
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 28 :-  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 29 जुलै, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 12 ऑगस्ट, 2016 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दि. 31 जुलै, 2016 रोजी नामदेव महाराज पुण्यतीथी, दि. 01 ऑगस्ट, 2016 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच दि. 07 ऑगस्ट, 2016 रोजी नागपंचमी व दि. 08 ऑगस्ट, 2016 रोजी श्रावण सोमवार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उध्वस्त केल्याचे निषेधार्थ, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच पंजाब व उत्तरप्रदेश मधील राजकीय घडामोडी वक्तव्ये व येथील राजकीय पक्ष शाखा यांचेकडून जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटना यांचेकडून आपल्या मागण्या करीता धरणे, मोर्चे, रास्तारोको, आमरण उपोषणे, बंद, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सारखे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 29 जुलै, 2016 रोजीचे 6.00 वा. पासुन ते 12 ऑगस्ट, 2016 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

                                                            *****  
जिल्ह्यातील 576 विद्यार्थी देणार सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा
परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू
हिंगोली, दि. 28 :- जिल्ह्यात सहाय्यक कक्ष अधिकारी (पुर्व) परीक्षा ही दिनांक 31 जुलै, 2016 रोजी (रविवार) सकाळी 10.30 ते 12.00 या वेळात घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पुढील दोन परीक्षाकेंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
केंद्राचे नाव व एकूण विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : 1) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (अ) - 288, 2) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (ब) - 288.
सदर परीक्षा उपकेंद्राचे इमारती व यामध्ये परिक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्ती शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन टेलीफोन बुथ चालु ठेवण्यास निर्बंध. सदरील आदेश हा नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेले आहे. अशा व्यक्तीना लागु राहणार नाही. परिक्षार्थी यांना परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजमेकर, गणकयंत्र, इलेक्ट्रॉनिक साधने इत्यादी घेवून जाण्यावर निर्बंध, करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

***** 
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26.19 मि.मी. पावसाची नोंद
          हिंगोली, दि.28 :- जिल्ह्यात गुरूवार दिनांक 28 जुलै 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 130.96 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  26.19  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 498.26 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 55.96 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  गुरूवार 28 जुलै, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली- 30.29 (483.43), वसमत 30.00 (506.38), कळमनुरी – 19.77 (552.32), औंढा नागनाथ – 26.50  (514.50) , सेनगांव 25.00 (434.65). आज  अखेर  पावसाची सरासरी 498.26.

*****