जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय शालेय/खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा
आयोजनासाठी
बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 16 :- जिल्ह्यातील
सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या
वतीने सन 2016-17 या वर्षाच्या शालेय/खेलो इंडिया/महिला क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रबोधनी
प्रवेशासाठी क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजनाबाबत व जिल्हा/तालुका स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत
माहिती देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे बैठकीचे आयोजन
करण्याचे ठरले आहे.
सदर
बैठकीस त्या-त्या तालुक्यातील माध्यमिक शाळेचे सर्व क्रीडा शिक्षक, केंद्र प्रमुख,
6 ते 8 वर्ग शाळा असलेल्या शाळांतील एक शिक्षक सदरील बैठकिस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात
येत आहे. खालील प्रमाणे तालुका निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व
शाळांतील एक शिक्षक सदर बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी
व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बैठकीचे आयोजन दिनांक
व वेळ तसेच स्थळ पुढीलप्रमाणे : 1) दिनांक 21 जुलै, 2016 सकाळी 11.00 वाजता, बहिर्जी
स्मारक विद्यालय, वसमत, 2) दिनांक 21 जुलै, 2016 दुपारी 2.00 वाजता, जिल्हा परिषद प्रशाला,
शिरडशहापूर ता. औंढा ना., 3) दिनांक 22 जुलै, 2016 दुपारी 12.00 वाजता, जिल्हा परिषद
कन्या प्रशाला, हिंगोली, 4) दिनांक
22 जुलै, 2016 दुपारी 3.00 वाजता, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, कळमनुरी, 5) दिनांक 23 जुलै, 2016 दुपारी
12.00 वाजता, तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव.
*****
No comments:
Post a Comment