क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
हिंगोली, दि.27 :- राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार
व जोपासणा करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे याच भुमिकेतून राज्याचे क्रीडा
धोरण 2012 घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे
आय़ोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणामध्ये खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या
पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळाची ओळख, खेळाची शास्त्रोक्त माहिती क्रीडा
शिक्षकांना करून देण्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात
होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण
मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय
निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि. 27 जुलै, 2016 ते 05 ऑगस्ट, 2016 या कालावधीत
सरस्वती विद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, जवळा बाजार येथे आयोजित कऱण्यात आले आहे या प्रशिक्षण
शिबीरास तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण
शिबीराचे उद्घाटन मा. शिक्षणाधिकारी व जिल्हा
क्रीडा अधिकारी यांच्या शुभ हस्ते दुपारी 3.00 वा. करण्यात येणार आहे तरी या उद्घाटन
प्रसंगी जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी, नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment