सामाजिक
न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 13
:- जिल्ह्यातील संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक
पुरस्कार / पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कार या
विविध पुरस्कारासाठी दिनांक 18 जुलै, 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे आवाहन
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक :- महाराष्ट्र राज्यात
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे
महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सामाजिक सुधारणावादी राज्य
म्हणून घेतले जाते. असे सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेला पुरस्कार
देण्यात येतो. 1) महाराष्ट्र राज्यातील 6 महसूल विभागासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे
6 संस्था, 2) प्रती संस्थेस रुपये 15 लक्ष व स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ, 3) पोलीस अधिक्षक/आयुक्त
यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल, 4) संस्था ही सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणारी
असावी, 5) सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे आवश्यक.
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार :-
रूढीपरंपरेविरुध्द व अस्पृश्यतेविरुध्द सामाजिक चळवळ उभारलेल्या भूमीहिन शेतमजूर कामगारांसाठी
काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात येतो. 1) व्यक्ती रक्कम रुपये
51 हजार शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, 2) व्यक्ती वय किमान 50 वर्ष व स्त्री
वय किमान 40 वर्षे, 3) व्यक्ती व संस्था ही सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणारी असावी,
4) सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक, 5) पोलीस अधिक्षक/आयुक्त यांचेकडील
चारित्र्य पडताळणी अहवाल.
संत रविदास पुरस्कार :- चर्मकार समाजाच्या व दलित
समाजाच्या उध्दारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात येतो.
1) व्यक्ती रक्कम रुपये 21 हजार व संस्थेस रक्कम रुपये 30 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,
शाल व श्रीफळ, 2) व्यक्ती वय किमान 50 वर्षे व स्त्री वय किमान 40 वर्षे, 3) पोलीस
अधिक्षक/आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल, 4) व्यक्ती व संस्था ही सामाजिक
न्याय क्षेत्रात चर्मकार व दलित समाजासाठी काम करणारी असावी.
*****
No comments:
Post a Comment