19 July, 2016

जिल्हयात कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
हिंगोली, दि. 19 :- जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 16 जुलै, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन ते 28 जुलै, 2016 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दिनांक 19 जुलै, 2016 रोजी गुरु पोर्णिमा हा सण साजरा करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात पुर सदृश्य परिस्थिती असल्याने विविध पक्ष संघटना यांचेकडून आपल्या मागण्या करीता धरणे, मोर्चे, रास्तारोको, आमरण उपोषणे आत्मदहन सारखे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात 16 जुलै, 2016 ते 28 जुलै, 2016 रोजी मध्यरात्री 12.00वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात आले आहे.  

*****

No comments: