जिल्हयात
कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 28 :- जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम
1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 29
जुलै, 2016 रोजीचे 06.00 वा. पासुन ते
दि. 12 ऑगस्ट, 2016 रात्रीच्या
12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण यांनी
कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दि. 31 जुलै, 2016 रोजी नामदेव महाराज पुण्यतीथी,
दि. 01 ऑगस्ट, 2016 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच दि. 07 ऑगस्ट, 2016 रोजी नागपंचमी
व दि. 08 ऑगस्ट, 2016 रोजी श्रावण सोमवार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उध्वस्त
केल्याचे निषेधार्थ, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या
निषेधार्थ तसेच पंजाब व उत्तरप्रदेश मधील राजकीय घडामोडी वक्तव्ये व येथील राजकीय पक्ष
शाखा यांचेकडून जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटना यांचेकडून आपल्या मागण्या करीता धरणे,
मोर्चे, रास्तारोको, आमरण उपोषणे, बंद, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सारखे आंदोलन करण्याची
शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण हिंगोली
जिल्हयात दि. 29 जुलै, 2016 रोजीचे 6.00 वा. पासुन ते 12 ऑगस्ट, 2016 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा
1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद
करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment