अप्रमाणित खताची विक्री
हिंगोली, दि.29 :-
कृषि विभाग,
जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडून मे. मातेश्वरी अग्रो केमीकल्स, खांडेगाव ता. वसमत
जि. हिंगोली ह्या कंपनीकडील दुय्यम अन्नद्रव्य मिश्रखत कॅल्शियम, मॅग्नेशियम,
सल्फर ग्रेड (10:05:10) ह्या खताचा
अप्रमाणित साठा 316 मेट्रिक टन जप्त केलाअसून मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या
आदेशानुसार जप्त केलेल्या दुय्यम अन्नद्रव्ये रासायनिक खताची विल्हेवाट
लावण्याच्या दृष्टीने दुय्यम अन्नद्रव्य खत उत्पादक परवानाधारक कंपनीस कच्चा माल
म्हणून विक्री करावयाची आहे.
त्या
अनुषंगाने कृषि आयुक्तालय, पुणे यांनी सर्वसाधारण प्रति बॅग कमाल किंमत रुपये 173
निश्चित केलेली आहे. तरी परवानाधारक दुय्यम अन्नद्रव्य खत उत्पादक कंपनीचे मालक /
व्यवस्थापक ह्यांनी कृषि विभाग, जिल्हा परिषद, बातमी प्रसिध्द झाल्यापासून आठ
दिवसाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहित नमुना
(अटी व शर्ती सह) कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयात उपलब्ध आहे.
अधिक
माहितीसाठी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे संपर्क
साधण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment