लघु उद्योगांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.22: - उद्योग संचालनालय यांच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ठ कामगीरी
करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व व्दितीय पारीतोषिक देवून गौरविण्यात येते.
प्रथम पुरस्कारासाठी रुपये 15 हजार रोख व गौरवचिन्ह तसेच व्दितीय पुरस्कारासाठी
रुपये 10 हजार रोख व गौरवचिन्ह दिले जाते. सन 2015 करिता जिल्हा पुरस्कारासाठी
जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्यासाठी खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.
1)
उद्योग घटकाची जिल्हा उद्योग केंद्र, कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून ती
तीन वर्षापुर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील दोन वर्षापासून उत्पादनात
असणे आवश्यक आहे. 2) उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. 3)
यापुर्वी ज्या उद्योग घटकांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार
मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील.
सदरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील
अर्ज व अधिक माहिती करिता जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे कार्यालयीन
वेळेत संपर्क साधवा. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट, 2016 राहील. याची
नोंद घ्यावी.
तरी वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या
जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment