19 July, 2016

खुल्या प्रवर्गाकरिता डी.टी.पी. वर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन
          हिंगोली, दि.19: - स्थानिक हिंगोली येथे खुल्या प्रवर्गाकरिता सर्वसाधारण योजनेंतर्गत संगणक डीटीपी वर आधारित एक महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी.) हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमातुन स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे.
                सदर कार्यक्रमात संगणक बद्दल माहिती, कोरल ड्रॉ, पेजमेकर, वर्ड, एक्सेल, फोटोशॉप इत्यादी विषयी या प्रकारचे अनेक तांत्रिक प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदिबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे. नॅशनल बँकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 22 जुलै, 2016 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत श्री. समाधान मोरे कार्यक्रम आयोजक मो. 9158272909 एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, दुसरा मजला एस - 12 जिल्हाधिकारी कार्यालय जि. हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा.
                सदरील कार्यक्रम दि. 25 जुलै, 2016 रोजी सकाळी 11.00 वा आयोजित करण्यात आले आहेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, एस. बी. बनसोडे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: