उद्योजकांनी एनओसी प्राप्त करुन घ्यावेत
---
अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी
हिंगोली, दि.
16 :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 44 अ अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सूलभ करण्याकरिता उद्योजकास विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक प्रमाणित माहिती एक खिडकी संरचनेगत एकत्रितरित्या उपलब्ध होण्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात अप्पर जिल्हाधिकारी श्री. राम गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली .
1) मे. महादेव बायोकोल, माळवटा गट क्रमांक 229 ता. वसमत, 2) मे. घृणेश्वर बायोकोल माळवटा गट क्रमांक 226, ता. वसमत, 3) मे. गणराज इंडस्ट्रीज गट क्रमांक 233 माळवटा ता. वसमत, 4) सय्यद वाजेद सय्यद साबेर माजेद सय्यद साबेर गट क्रमांक 123 ता. कळमनुरी अशी एकूण चार उद्योजकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांना समक्ष सुचना दिल्या व प्रत्येक यंत्रणेची नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) कशी प्राप्त करावी, हे समजावून सांगितले.
यावेळी हिंगोली उपविभागीय अधिकारी राहूल खांडेभऱ्हाड, वसमत उपविभागीय अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) एन. एन. घुले, नगर रचना सहाय्यक संचालक सु. ल. कमठाणे, हिंगोली तहसीलदार किरण अंबेकर, विभागीय वन अधिकारी एच. एल. कांबळे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्हि. एम. जवळेकर, उद्योग निरीक्षक आर. डी. जोंधळे, जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयाचे जे.एम. बेंडे, औंढा सहाय्यक निबंधक एम. ए. भोसले, का. अ. पू.पा. वि. वसमत अ.अ. मेश्राम , म.औ.वि.म.नांदेड महेश महाडीक, जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे आदि विविध विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment