22 July, 2016

निवडणूकीचे नामांकन भरताना जात पडताळणी समितीकडे
 जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पावती आवश्यक

हिंगोली, दि.22: - जिल्ह्यातील नगर परिषद हिंगोली, वसमत, कळमनुरी येथे सार्वत्रिक निवडणूक 2016-17 होणार आहेत. सदर निवडणूका मध्ये ज्या इच्छूक उमेदवारांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग च्या राखीव पदावर निवडणूक लढावयाची असेल त्यानी निवडणूक चे नामांकन अर्ज भरण्यापूर्वी जातीचे वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र वैधता बाबत सादर केलेल्या प्रस्तावाची पोहच पावतीसह मतदान प्रक्रिया मध्ये नामांकन भरणे आवश्यक राहिल. याची सर्व नगर परिषद हद्दितील मतदारांनी नोंद घ्यावी, असे जाहिर आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: