08 July, 2016

जिल्ह्याला जुलै 2016 या महिन्याचे 444 के. एल. केरोसिन प्राप्त
        हिंगोली, दि. 8 :- हिंगोली जिल्ह्याचा माहे जुलै 2016 या महिन्याकरिता 60 टक्के केरोसिन कोटा 444 के. एल. नियतन प्राप्त झालेले असून तालुका निहाय व घाऊक / अर्ध घाऊक परवानाधारक निहाय केरोसिन नियतन वाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
                जिल्ह्याकरिता बी.पी.सी ( 144 के. एल. ) एच.पी.सी. ( 228 के. एल. ) व आय.ओ.सी. ( 72 के. एल. ) असे एकूण 444 के. एल. केरोसिन नियतन प्राप्त झाले असून एजंट निहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे. 1) एम. बी. राठोर, हिंगोली - 72 के. एल. 2) वसमत ऑईल एजन्सी, 72 के. एल. 3) बी.टी. खुराणा हिंगोली, 108 के. एल. 4) ए.पी.पटेल हिंगोली, 60 के. एल. 5) उमेदमल भिकूलाल वसमत, 60 के. एल. 6) सुभाष चौधरी ॲन्ड कंपनी 72 के. एल.
                तालुकानिहाय 444 के. एल. केरोसिन नियतनाचे वितरण पुढीलप्रमाणे:-  हिंगोली - 96 के.एल., कळमनुरी - 120 के.एल., सेनगांव - 72 के.एल., वसमत - 84 के.एल. व औंढा नागनाथ - 72 के.एल.
                अर्ध घाऊक परवाना धारकांनी विहित तारखेपर्यंत एजंटकडून दिलेली केरोसिनची उचल करून तहसिलदार यांनी ठरवून दिल्यानुसार किरकोळ, हाँकर्स, स्वस्त धान्य दुकानदार यांना वाटप करावे. व केरोसिन वाटप केल्याचा अहवाल तहसिलदार यांच्या प्रमाणपत्रासहित जिल्हा पुरवठा कार्यालयात सादर करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केली आहे.
                                                                                                     *****
वृत्त क्र. 440
ऑगस्ट महिन्यासाठी अंत्योदय योजनेचे गहू व तांदुळ नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 8 :- माहे ऑगस्ट - 2016 या महिन्यासाठी अंत्योदय योजनेतंर्गत गहू - 677 मे. टन व तांदुळ - 451 मे. टन मंजुर झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारी ( मे. टन ) पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली - गहू - 178, तांदुळ- 119, कळमनुरी - गहू - 141, तांदुळ - 94, सेनगांव - गहू - 145, तांदुळ - 97, वसमत - गहू- 124, तांदुळ - 82, औंढा नागनाथ - गहू - 89, तांदुळ- 59, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.         
      *****  
वृत्त क्र. 441                                                                                                                          
अंशकालीन उमेदवारांना आवाहन
हिंगोली, दि. 8 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडील अंशकालीन उमेदवारांची यादी अद्ययावत करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या माहितीसह, संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली येथे ज्या उमेदवारांनी यापूर्वी कार्यालयात नांव नोंदणी केलेली नाही तसेच ज्या अंशकालीन उमेदवाराचे एम्प्लॉयमेंट कार्ड बंद पडलेले आहे. अशा अंशकालीन उमेदवारांनी नव्याने एम्प्लॉयमेंट कार्ड काढून या कार्यालयात अंशकालीन उमेदवार असल्याबाबतचा शपथ पत्रामध्ये आपली माहिती भरून द्यावी. सदरची माहिती ही समक्ष भरून द्यावयाची असल्याने पुढील कागदपत्रासह उमेदवाराने स्वत: हजर रहावे.
1) एस.एस. सी. सनद, 2) पदवी प्रमाणपत्र, 3) अंशकालीन प्रमाणपत्र, 4) अंशकालीन उमेदवारांचे नेमणूकीचे आदेश, 5) एम्प्लॉयमेंट कार्ड इत्यादी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती घेऊन यावे. सदरचा शपथपत्र भरून देण्याची अंतिम दिनांक 11 जूलै, 2016 आहे. याची अंशकालीन उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****  

No comments: