08 July, 2016

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रम पंधरवाडा
          हिंगोली, दि. 8: - राज्यामधील अर्भक मृत्यु दर, बाल मृत्यु दर कमी करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्या बाल मृत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते.
            करिता सन 2014 व सन 2015 मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवाड्याच्या यशस्वी प्रयत्नानंतर  याहीवर्षी अतिसारामुळे होणारे बाल मृत्यु शुन्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात दिनांक 11 ते 23 जुलै, 2016 या कालवधीत विशेष नियंत्रण पंधरवाडा ही योजना राबविण्याचे ठरविले आहे.
            दिनांक 11 ते 23 जुलै, 2016 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा या पंधरवाड्यामध्ये 1) जनजागृती, 2) अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, 3) ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावा याबातची प्रात्यक्षिके, 4) आशा स्वयंसेविका मार्फत ओआरएस व झिंक गोळ्यांचे घरोघरी वाटप, 5) सर्व आरोग्य संस्थेमध्ये ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करणे, 6) अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार करणे याबाबींचा समावेश असणार आहे.

***** 

No comments: