जिल्हयातील अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन मेळाव्याचे
आयोजन
हिंगोली, दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांचेवतीने सन 2015-16 मध्ये
इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 85% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांकरीता सोमवार दि. 01 ऑगस्ट,
2016 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांचे अध्यक्षतेखाली व
पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांचे प्रमुख उपस्थितीत करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पुर्व
बाजुस, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली या ठिकाणी
आयोजित करण्यात आले आहे.
सदर करियर मार्गदर्शन मेळाव्यासाठी जिल्हयातील जास्तीत
जास्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment