जलतरण तलावाची तात्काळ दुरुस्ती करुन
सर्वसामान्य लोकांना पोहण्यासाठी खुला करुन देण्यात
यावा
--- जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
--- जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
हिंगोली,
दि.
15 :- जिल्हा क्रीडा संकुलातील जागेत नव्याने चार कोर्ट
असलेले बॅडमिंटन हॉल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना
आदेश देण्यात आले. तसेच तेथील जलतरण तलावाची तात्काळ दुरुस्ती करुन ते सर्वसामान्य
लोकांना पोहण्यासाठी खुला करण्यात यावे, अशी सुचना जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिली.
यावेळी
अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी,
उपशिक्षणाधिकारी लहाणे एच. आर., जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रिडा अधिकारी
किशोर पाठक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डि. बी. निळकंठ, जिल्हा माहिती
कार्यालयाचे प्रतिनिधी विवेक डावरे आदि यावेळी उपस्थित होते.
जिल्हा
क्रिडा संकूल समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी श्री. भंडारी यांनी जिल्हा क्रिडा
संकूल निर्मितीसाठी यापूर्वी उपलब्ध झालेल्या निधीबाबत माहिती घेतली.
यावेळी
नवीन बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, वसतीगृह , स्क्वॅश हॉल, लॉन टेनिस कोर्ट, संकुलातील
अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, खुले प्रेक्षागृह, प्रवेशद्वार, लॉन टेनिस कोर्टवर चेन्जिंग
रुम बांधणे लॉन टेनिस कोर्टची दुरुस्ती, स्विमिंगपूल इमारत व संरक्षण भिंतीची दुरुस्ती
इत्यादी कामाबाबत जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी आढावा घेतला.
जिल्हा
क्रिडा संकुलातील जलतरण तलाव, वस्तीगृह इमारत, 400 मीटर धावणे मार्ग इत्यादीच्या दुरुस्तीबाबतचाही
सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच नवीन कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यास मान्यता देण्याबाबत
विविध खेळाची मैदाने (कब्बड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल) क्रिडा साहित्य अंदाजपत्रक इत्यादी
बाबीवर जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी बैठकीत माहिती दिली. तसेच मागील बैठकीच्या
इतिवृत्ताचे वाचनही केले.
*****
No comments:
Post a Comment