14 July, 2016

हिंगोली जिल्ह्याकरिता चार बॅडमिंटन कोर्टाची मंजूरी
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्याकडून जागेची पाहणी
हिंगोली, दि. 14 :-  हिंगोली जिल्ह्यासाठी चार बॅडमिंटन कोर्टचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. सदर हिंगोली तालुका क्रिडा संकुल उभारणी करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी जागेची पाहणी केली. तसेच जिल्हा क्रिडा कार्यालय, हिंगोली येथील स्विमिंग पूल सुरु करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी जिल्हा क्रिडा संकूल कार्यालयाच्या परिसरात वृक्षाचीही लागवड केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, जिल्हा क्रिडा अधिकारी किशोर पाठक आदि यावेळी उपस्थित होते.





*****

No comments: