जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13.32 मि.मी. पाऊस
सर्वाधिक पाऊस औंढा नागनाथ तालुक्यात
हिंगोली, दि.18: - जिल्ह्यात सोमवार दिनांक
18 जुलै 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 66.62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 13.32 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 359.98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 40.43 टक्के
झाली आहे.
जिल्ह्यात सोमवार 18 जुलै, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) : हिंगोली- 8.00 (317.57), वसमत – 18.29 (384.38), कळमनुरी – 10.83 (412.64), औंढा नागनाथ – 24.00 (352.00) , सेनगांव – 5.50 (333.32). आज अखेर पावसाची सरासरी 359.98.
*****
No comments:
Post a Comment