19 July, 2016

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून कर्ज वितरण
हिंगोली, दि. 19 :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या वित्तीय अनियमितता, गैरव्यवहार व अपहार प्रकरणी दहिसर पोलीस स्टेशन, मुंबई येथे 336/15 प्रमाणे गुन्हा नोंद असून त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई मार्फत चालू आहे.
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून सन 2014-15 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात झालेल्या कर्ज वितरणची संक्षिप्त यादी संबंधित गावचे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावली आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) जिल्हा कार्यालय, हिंगोली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली ) या कार्यालयाचे दर्शनीय भागावर लावली आहे. तसेच संबंधित गावचे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावली आहे. यादी मधील लाभार्थीचे नावासमोर जी रक्कम दर्शविण्यात आली आहे ती पुर्ण रक्कम संबंधित लाभार्थीस मिळाली नसेल किंवा कर्ज वितरणाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी hccidcrimekb@gmail.com या ईमेल आयडी व 02456-223831 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा. जेणेकरून आम्हाला तपास करणे सोईचे होईल, असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

***** 

No comments: