30 July, 2016

राष्ट्रीय पशुधन विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 30 :- राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन  विमा योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालु आहे या योजनेची प्रभावीपणे अंमबजावणी होण्याच्या दुष्टीने दि. 1 ऑगस्ट, 2016 ते 15.8.2016 च्या दरम्यान खालील प्रमाणे  आयोजन केले आहे.
सदर शिबीराचे आयोजन तालुक्यानिहाय पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. यात हिंगोली तालुक्यातील हिंगोली येथे दि. 1 ऑगस्ट, 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि. 4 ऑगस्ट, 2016 रोजी नर्सी नामदेव,  दि. 8 ऑगस्ट, 2016 रोजी सिरसम. वसमत तालुक्यातील कुरुंदा, आरळ, टेभुर्नी, पळसगांव येथे दि. 2 ऑगस्ट, 2016 शिबीराचे आयोजन होणार आहे. तर दि. 5 ऑगस्ट, 2016 रोजी बोराळा, हट्टा, आडगांव, शिरळी, वाई. दि. 12 ऑगस्ट, 2016  सातेफळ, खांडेगांव, गिरगांव. दि. 15 ऑगस्ट, 2016 आंबा, धामगांव, वाखारी, हयातनगर, पळशी. कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे दि. 3 ऑगस्ट, 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि. 6 ऑगस्ट, 2016  कळमनुरी. दि. 10 ऑगस्ट, 2016  रोजी आखाडा बाळापुर व दि. 13 ऑगस्ट, 2016 रोजी रामेश्वर तांडा याठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगांव सोळके येथे दि. 7 ऑगस्ट, 2016 रोजी तर दि. 11 ऑगस्ट, 2016 रोजी जवळा बाजार येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि सेनगाव तालुक्यातील सेनगांव येथे दि. 9 ऑगस्ट, 2016 रोजी तर  दि. 14 ऑगस्ट, 2016 रोजी आजेगांव येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
                या योजनेंतर्गत गाय, म्हैस, देशी/संकरीत दुभती जनावरे आणि शेळी, मेंढी, डुकरे, ससे, एडका इत्यादी तसेच बैल, घोडे, गाढव, खेचर, उंट, इत्यादी ओझेवाहु जनावरांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक घरातील लाभार्थ्याला 5 पशुधन युनिट (5पशु/50 शेळया, मेढया, ससे इ.) पर्यत मर्यादित आहे.
        विम्याचे संरक्षण पॉलिसी कालावधीत पशुधनाचा मृत्यु हा आजारपण, अपघात, आग, विज पडणे, पुर, वादळ, भुकंप, दुष्काळामुळे   झाल्यास नुकसान भरपाई मिळेल. पशुधनाच्या कायमच्या संपुर्ण अपंगत्वासाठी विमा संरक्षण पाहिजे असल्यास प्रतिवर्षी 10 टक्के ज्यादा दराने विमा हप्ता आकारला जाईल.
        पशु मुल्यमापन पशुधनाचे मुल्य सामान्यपणे गायीसाठी रु.3 हजार/प्रती लिटर/ प्रती दिवस तर म्हशीसाठी रु.4 हजार प्रती लिटर/प्रती दिवस विचारात घेऊन ठरविण्यात येईल आणि अन्य प्रकारच्या पशुधन मुल्यमापनासाठी पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्र वरून ग्राहय धरले जाईल.
                एक वर्षाकरिता रु. 2.45 टक्के तर 3 वर्षाकरिता 6.40 टक्के या विमा हप्त्या दराने दारिद्रय रेषेवरील ( एपीएल ) लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान असणार आहे. तर दारिद्रय रेषेखालील अ.जा./अ.ज.जा.लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदान असणार आहे.
                विमा कृत पशुधनाची ओळख म्हणुन त्यांच्या कानात 12 अंकी ओळख क्रमांकाचा बिल्ला बसवला जाणार आहे. ज्या जनावरांना पुर्वीचा बिल्ला मारलेला असल्यास तो ओळख क्रंमाक म्हणुन वापरण्यात येणार आहे.
          विमा प्रस्ताव देतांना प्रस्ताव पत्रासोबत शासकीय पशुवैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, जनावरांचा मालक व बिल्ला असलेला फोटो तसेच विमा धारकाचा मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.
        विमा दाव्याच्या संदर्भात जनावराचा मृत्यु झाल्यास विमा दाव्याची रक्कम विमा रक्कमे एवढी असेल तर कायमच्या संपुर्ण अपंगत्वाच्या प्रकरणात विमा रक्कमेच्या 75 टक्के एवढी असेल. दावा नोंदविण्यासाठी न्यु इंडिया इंश्योरन्स कंपनी लि. ने उपलब्ध करुन दिलेल्या टोल फ्री क्रमांक 1800 209 1415 यावर जनावराच्या मृत्यु बाबतची प्रथम सुचना जनावरांच्या मालकाने 24 तासाचे आत देणे आवश्यक आहे. दावा निकाली काढण्यासाठी दावा फॉर्म, विमा पॉलिसीची प्रत, शवविच्छेदनाचा अहवाल, कानातला बिल्ला आणि बॅंक खात्याच्या सविस्तर माहितीसह कागदपत्र देणे आवश्यक आहेत. सदरची योजना केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यान्वित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयच्या पत्यावर संपर्क साधावा - दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.मायक्रो ऑफीस, चैाधरी कॉम्लेक्स, अग्रसेन चौका जवळ, हिंगोली व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत संपर्क करावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: