कामाच्या ठिकाणी
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण
अधिनियम 2013 अंतर्गत समिती गठीत करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.5: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक
छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या कलम 4(1) नुसार
कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता
तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. सदर तक्रार समिती गठीत न केल्यास उपरोक्त
कायद्यात कलम 26 अंतर्गत रु. 50 हजार दंड आकारण्याची तरतूद दर्शविली आहे.
याकरीता जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी
कलम 26 व कलम 4(1) चे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी, शासकीय, निमशासकीय, हॉटेल,
खानावळ, भोजनालय, लॉज, मंगल कार्यालय येथे ही समिती तात्काळ गठीत करावी, असे आवाहन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी
जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दूसरा मजला एस-7, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा.
********
No comments:
Post a Comment