निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब निवृत्ती वेतन धारकांना
माहे जानेवारी 2019 पासून सातवा वेतन
हिंगोली,दि.30: जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन धारक आणि कुटूंब
निवृत्त वेतन घेणाऱ्या दि. 31 डिसेंबर, 2015 पुर्वीच्या सर्व निवृत्ती वेतन
धारकांना माहे जानेवारी 2019 चे वेतन सातवा वेतन आयोगाप्रमाणे प्रदान करण्यात आले
असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे व अप्पर कोषागार अधिकारी
(निवृत्ती वेतन) बी. के. सांडभोर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment