मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला
लाभार्थ्यांशी संवाद
हिंगोली,दि.14: जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद
उपक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील उन्नत शेती-समृध्द
शेतकरी कृषि यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, भाऊसाहेब फुंडकर योजना, राष्ट्रीय अन्न सुरुक्षा अभियान
आदी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी यावेळी संवाद
साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जालना, पालघर,
अहमदनगर, परभणी, वाशीम, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद या कार्यक्रमाअंतर्गत
व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी हिंगोलीतील हनुमान वाबळे, मधुकर
जाधव, प्रविण मुंढे, सखाराम ढाकरे, अनिल जाधव, खंडुजी शितोळे, पांडुरंग भवर,
पांडुरंग जगताप या लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विजय लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, कृषि पर्यवेक्षक श्री. कोटकर
उपस्थित होते. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी लोकसंवाद कार्यक्रमासाठी
मार्गदर्शन केले.
****
No comments:
Post a Comment