विद्युत सुरक्षा सप्ताह – 2019
चे उदघाटन
·
चुकीला माफी नाही - जबाबदारी सर्वांचीच
हिंगोली, दि.14: उद्योग, ऊर्जा व कामगार
विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात विज सुरक्षितते बाबत जनजागृती होणे
करीता 11 ते 17 जानेवारी 2019 या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात
येत आहे. सदरील सप्ताहाचे उदघाटन 11 जानेवारी 2019 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
औंढा ता.औंढा (ना) हिंगोली येथे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग हिंगोली यांच्या
वतीने श्री. नि.धों. मुळुक श्री.महाजन सर. श्री.राऊत सर यांचे उपस्थीतीत औद्योगिक
प्रशिक्षण संस्था औंढा, हिंगोली येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक म्हणुन बोलताना
नि.धों. मुळुक सहाय्यक विद्युत निरीक्षक
यांनी आजच्या आधुनिक जिवनात अन्न, वस्त्र व निवारा या मुलभुत गरजां पाठोपाठ
विजेला चौथे स्थान असल्याचे सांगितले. घर, उद्योग, कार्यालय अथवा शेती मधे विज
उपकरणे वापरताना दर्जेदार उपकरणांचा वापर करावा. विज प्रवाह दिसत नसल्यामुळे ही
आधुनिक मुलभुत गरज हाताळताना किंवा वापरताना योग्य काळजी न घेतल्यास अपघातांस
आमंत्रण होईल. घरगुती, औद्योगीक, कार्यालये, शाळा व इतर ठिकाणी उभारण्यात येत
असलेल्या विद्युत संचमांडणीची कामे मान्यताप्राप्त व्यक्ति अथवा विद्युत
ठेकेदाराकडुन करण्यात यावी, असे सांगितले. वायरिंग करताना आर्थिंग करणे व त्याचा
वापर होणे महत्वाचे आहे तसेच संचमांडणीस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवण्यात यावे.
विजेचा वापर करतेवेळी फाजील आत्मविश्वास असणे कामाचे नाही, असे त्यांनी आवर्जुन
नमुद केले. यावेळी विद्युत सुरक्षेविषयी ध्वनी फित दाखवण्यात आली व त्याद्वारे
उपस्थीतांचे प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे प्रबोधन करण्यात आले.
सदर
सप्ताहामध्ये विविध शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत , सार्वजनिक ठिकाणे, येथे
प्रत्यक्ष कार्यक्रम करुन विजेच्या सुरक्षित वापराबाबत विभागाचे कर्मचारी,
महावितरण व मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदार
प्रबोधन करणार असल्याचे नि.वा.मदाने. विद्युत निरीक्षक,यांनी सांगितले त्या
अर्तंगत 14 जानेवारी रोजी गांधी विद्यालय च सिध्देश्वर विद्यालय वसमत येथे सामुहिक
विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली त्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वृंद
उपस्थित होते.
सदर
कार्यक्रमासाठी विद्युत निरीक्षक कार्यालय हिंगोली येथील मुळुक, मंगनाळे तसेच
महाजन,राऊत, पाठक,म्हस्के माचेवार, भालेराव , बलमखांबे व मान्याता प्राप्त विद्युत ठेकेदार
देव,दशरथे,नांदगावकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विद्युत
निरीक्षक कार्यालय हिंगोली येथील अंबिलवादे , श्रीमती चिंचवनकर, बोलके यांनी
परिश्रम घेतले.
000000
No comments:
Post a Comment