29 January, 2019

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे 31 जानेवारी रोजी आयोजन


जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

         हिंगोली, दि.29: येणाऱ्या 31 जानेवारी रोजी सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, येथील बहुविध जिल्हा प्रशाला मैदान, हिंगोली येथे सकाळी 9.00 वाजता  स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांचे वय वर्षे 16 ते 30 या वयोगटातील असणे आवश्क आहे. स्पर्धेचा कोड नंबर मिळविण्यासाठी स्पर्धकांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच वरील दिलेल्या वेळेवर हजर राहणे बंधनकारक आहे. स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: स्वखर्चाने आणावयाचे आहे. सदरची स्पर्धा जिल्हास्तरीय असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही 16 ते 30 या वयोगटातील युवक व युवती स्पर्धेत भाग घेऊ शकणार असून परीक्षण समितीचा निकाल हा अंतिम मानला जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना युवक गटात  प्रथक क्रमांक 1000 रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक 700 रुपये व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक 500 रुपये व प्रशस्तीपत्र तर युवती गट प्रथक क्रमांक 1000 रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक 700 रुपये व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक 500 रुपये व प्रशस्तीपत्र असे बक्षीसे देण्यात येणार आहेत.
तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांनी केलेआहे.
****

No comments: