शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या प्राथमिक
छाननी अहवालावर
आक्षेप/हरकती नोंदविण्यास 28 जानेवारी पर्यंत मुदत
हिंगोली, दि.25 : शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्काराच्या शासन निर्णय दि. 16 ऑक्टोंबर 2017, शासन शुद्धीपत्रक दि. 08 डिसेंबर
2017 व दि. 24 ऑक्टोंबर 2018 च्या तरतुदीनुसार सन 2017-18 या वर्षीच्या शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्काराचा प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या लिंकवर क्लीक करुन www.xlroots.com वर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
उपरोक्त शासन निर्णयाच्या
निकषानुसार व तरतुदीनुसार प्राथमिक छाननी अहवाल पुरस्कार निहाय दि. 24 ते 28 जानेवारी 2019 या कालावधीत संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आलेला असून, सदरच्या कालावधीत एखाद्यास हरकत नोंदवायची असल्यास उपरोक्त
संकेतस्थळाला भेट देउन देण्यात आलेला विहित नमुना डाउनलोड करुन त्यामध्ये आपली हरकत/आक्षेप
नमुद करावी व नमुद केलेली हरकत/आक्षेप पुन्हा त्याच संकेतस्थळावर दि. 24 ते 28 जानेवारी
2019 या कालावधीत अपलोड करावी अशा मार्गदर्शनात्मक सुचना संचालनालयाकडून आल्याच्या
अनुषंगाने असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment