15 January, 2019

हिंगोलीत 10 फेब्रूवारी रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन










हिंगोलीत 10 फेब्रूवारी रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन

हिंगोली, दि.15 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे  10 फेब्रूवारी रोजी विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.  
या महाआरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शासन, प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील विविध संघटना, सामाजिक संस्था आदींनी यात सहभागी व्हावे. तसेच याकरीता आवश्यक ते नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहामध्ये महाआरोग्य शिबीराच्या आयोजनासंदर्भात सर्व प्रशासकीय  यंत्रणांच्या  पूर्वतयारी आढावा बैठकीत श्री. जयवंशी हे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी,  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के, रामेश्वर नाईक, संदीप जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

****



No comments: