शासकीय-निम शासकीय
कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना
दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे
आवाहन
हिंगोली, दि.7: रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस
वाढत असून, यामध्ये दुचाकी चालकाचे होणारे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर
आहे.अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून त्यांचा वेळोवेळी आढावा
घेण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देश पातळीवर रस्ता सुरक्षा
समिती, राज्य पातळीवर राज्य सुरक्षा समिती व जिल्हास्तरावर जिल्हा सुरक्षा समितीची
स्थापना करण्यात आलेली आहे.
हिंगोली
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये आपघातांचा आढावा घेतला असता दुचाकी
वाहनाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्यावरुन रस्त्यावरील अपघात
कमी करण्याच्या दृष्टीकोणातून दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे गरजेच आहे.
जेणे करुन दुचाकीच्या अपघातांमध्ये डोक्यावर पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून हेल्मेट
वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हेल्मेटची सक्ती
करण्या अगोदर मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 व महाराष्ट्र मोटार वाहन नियम
1989 नियम 250 च्या तरतुदी नुसार शासकीय / निम शासकीय कार्यालयातील जे
अधिकारी/कर्मचारी दुचाकीचा वापर करतात त्यांना 15 जानेवारी, 2019 पासून हेल्मेट
वापरणे बंधनकारक आहे असे समितीमध्ये ठरवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील
सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व
अधिकारी/कर्मचारी यांना हेल्मेट वापराबाबत सूचना द्याव्यात. जे शासकीय
अधिकारी/कर्मचारी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार
वाहन कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन
अध्यक्ष जिल्हा सुरक्षा समिती, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment