स्वच्छ सुंदर शौचालय
जनजागृतीपर स्पर्धेत सहभागी व्हावे
-डॉ. एच.पी. तुम्मोड
हिंगोली, दि.8: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या पेय
जल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा आयोजन
करण्यात आले आहे. या अभियान स्पर्धेचा कालावधी 1 ते 31 जानेवारी, 2018 या काळात होणार असून, जास्तीत-जास्त नागरिकांनी
सर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वैयक्तीक
शौचालयाचा नियमित वापर व्हावा ग्रामीण भागात स्वच्छतेची संस्कृती रुजावी या
उद्देशाने ही देशभरात ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत गावातील प्रत्येक
कुटुंबाने आपल्या शौचालयाला नव्याने रंग देऊन स्वत:च्या कल्पकतेने संदेश देऊन लिहून शौचालय आकर्षित करुन, याकामी स्वच्छ
भारत मिशन ग्रामीण लोगो नागरिकांना वापरता येणार आहे. त्यासाठी कुटुंबियांनी स्वत:
खर्च करावयाचा आहे. याकरिता सिएसआर व विविध शासकीय योजनेचा समन्वय साधला जावू
शकतो. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रंबविलेल्या शौचालयाच्या टक्केवारीनुसार
राज्यातील तीन शौचालयाचे छायाचित्र राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जाणार
असून सदर छायाचित्र राज्यस्तरावर पाठवावयाचे आहे. सदरील छायाचित्र, गाव व तालुका
यांची माहिती 31 जानेवारी रोजी पाणी व स्वच्छता संस्था, मुंबई यांचेकडे पाठविणे
आवश्यक आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन
स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. पोहरे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment