ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीया पूर्ण
करण्याकरिता पूर्तता करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि.31: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकाराच्या
शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 1 ऑक्टोबर 2018 पासुन नव्याने कार्यान्वीत
झाली असुन https://mahadbt.mahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती
विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभाग व
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात
येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केलेले आहे.
सदर अर्ज संबंधीत महाविद्यालयाकडुन तपासुन व पडताळणी करुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत.
महाविद्यालयाकडुन प्राप्त झालेल्या अर्जावर
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडुन ऑनलाईन मान्यता देण्यात
येत आहे. सदर पोर्टलवर मान्य झालेल्या अर्जाची अदायगीची प्रक्रिया यशस्वी
होण्याकरीता खालील बाबीची विदयार्थ्यांच्या लॉगीनमधुन ऑनलाईन पुर्तता होणे आवश्यक
आहे.
प्रणालीमधील
"पेमेन्ट वाऊचर"(Payment Vaucher Details) या स्क्रीनवरील
"इन्स्टीटयुट स्टेटस " (Institute Stutus) " स्टुडंट स्टेटस "
(Student Status) हे पहिल्या First Installment सत्राकरीता "apporved" म्हणजेच मान्यता दर्शविली असल्यास आपणास "Redeem " हे बटण सक्रिय/ ॲक्टीव
झालेले दिसेल. वरील स्क्रीन मध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांना मान्य झालेल्या
रक्कमा दर्शविण्यात येत आहेत. सदर रक्कमा या संबंधीत विद्यार्थ्यांच्या बँक
खात्यावर तसेच संबंधीत महाविद्यालयाच्या बँक खात्यावर वितरीत करुन घ्यावयाच्या
असल्यास "Redeem " बटण दाबणे
आवश्यक आहे. या प्रक्रियेस वाऊचर जनरेशन (Vaucher Genration) असे संबोधी केले
जाते.विद्यार्थ्यांच्या लॉगीनमधुन
उपरोक्त 1 व 2 मध्ये नमुद केलेली ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण न केल्यास मान्य झालेली
विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरण होणार नाही याची नोंद
घ्यावी.विद्यार्थ्यांचे बँक
खातेक्रमांक प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत केलेले बँक
खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अदायगीच्या प्रक्रियेमध्ये
प्रत्येक स्तरावर एस.एम.एस (SMS) येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत
बँक खात्याशी संलग्न असून तो अद्ययावत असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत असे
निदर्शनास येत आहे की, वाऊचर जनरेशन (Vaucher Genration) झालेल्या अर्ज संख्येपैकी
केवळ 10% विद्यार्थ्यांनी वाऊचर
रिडीमशन (Vaucher Redeemtion ) प्रक्रिया पुर्ण केलेली असून 90% विद्यार्थ्यांनी वाऊचर रिडीमशन प्रक्रिया
अद्यापही केलेली नाही. सदर
प्रक्रिया विद्यार्थ्यांमार्फत पूर्ण
होत असल्याने विद्यार्थ्यांचे व
संबंधीत महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वितरण पुर्ण होत नसल्याचे
निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने उपरोक्त सुचना मधील प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या लॉगीन मधूनच पूर्ण करुन
घेणे आवश्यक आहे. तसेच इतर बाबी परिपुर्ण नसल्यास त्या त्वरीत करुन घेण्यात
याव्यात. उपरोक्त दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक
खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधीत विद्यार्थ्यांची असेल याबाबत सामाजिक
न्याय विभाग / विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभागाची जबाबदारी राहणार नाही याची
सर्व विदयार्थ्यांनी दखल घ्यावी. महाविद्यालयातील/विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांना उपरोक्त सूचना विविध माध्यमातुन
विदयार्थ्यांना त्वरेने कळवाव्यात,असे आवाहन भाऊराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त,समाज
कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment