11 January, 2019

जलसमृध्दी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थी निवडीची सोडत पात्र लाभार्थ्यांची सोमवारी होणार सोडत


                                                           
जलसमृध्दी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थी निवडीची सोडत

·   पात्र लाभार्थ्यांची सोमवारी होणार सोडत

हिंगोली, दि.11: राज्यातील जलयुक्त शिवार अभियान / जल व मृद संधारणाची काम करण्यासाठी जलसमृध्दी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने दिनांक 2 जानेवारी, 2018 रोजी घेतला होता. सदरील शासन निर्णयान्वये हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान/जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी 50 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी उत्पादन संस्था नोंदणीकृत शेतकरी गटास, बेरोजगाराच्या सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत एकूण 241 अर्ज प्राप्त झाले होते. सदरील प्राप्त अर्जदारांपैकी 149 अर्जदार हे शासन निर्णयातील अटींची पूर्तता करीत असल्याने पात्र ठरले होते. सदरील 149 अर्जदारांपैकी 16 अर्जदारांनी कर्ज मंजुरीचे आदेश सादर केले होते. पंरतू त्या पात्र 16 अर्जदारांपैकी 7 अर्जदारांनी प्रत्यक्ष मशीन खेरदी केल्याचा पुरावा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयास सादर केलेला आहे. उर्वरित 9 अर्जदारांनी मुदतीत प्रत्यक्ष मशीन खरेदी केली नसल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे.
            उर्वरित पात्र 133 अर्जदारांपैकी 43 लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा समिती मार्फत निवड समितीची सभा दि. 14 जानेवारी, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजता दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा हिंगोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.
            तरी सदर योजनेत पात्र ठरलेल्या 133 अर्जदारांनी सदरील सोडतीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: