राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत विविध आजारांच्या
शस्त्रक्रीया व अनेकांना उपचार
हिंगोली, दि.23: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 1 एप्रिल, 2013 पासून महाराष्ट्र राज्य
रार्ष्टीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येत असून सदर कार्यक्रमाअंतर्गत 0
ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण 17
वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक पथकामध्ये एक वैद्यकीय
अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी(महिला), औषधनिर्माता व परिचारीका यांचा समावेश
करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांची
वर्षातून दोन वेळेस व शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एक वेळेस आरोग्य तपासणी
करण्यात येत असते. सदर मोफत आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात येत असून
यामध्ये आजारी बालकांना अंगणवाडी व शाळेतच प्राथमिक औषधोपचार देवून त्यात
आढळलेल्या गंभीर व दुर्धर आजाराच्या बालकांना पुढील संदर्भसेवा ग्रामीण रुग्णालयस्तर, जिल्हा रुग्णालयस्तर व
वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर करण्यात येते.
या कार्यक्रमातंर्गत मुख्यत: चार
विशिष्ट बाबींवर भर देण्यात येतो.
जन्मत: असणारे बालकांचे
व्यंग उदा. फाटलेले ओठ, तिरळेपणा, बहिरेपणा इत्यादी, बालकांमध्ये निर्माण होणारी
जीवनसत्वाच्या तथा पोषणाच्या अभावी होणारे आजार, बालकांना होणारे गंभीर आजार उदा.
ऱ्ह्रदयरोग्, संसर्गजन्य रोग इत्यादी, बालकांच्या नैसर्गिक विकासात असणारे अडथळे
उदा. मतीमंद, वाचा, श्रवण दोष इत्यादी.
हे चार विषय तथा इतर
होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यात येत असतो. सन 2018-19 या वर्षात प्रथम
तपासणीमध्ये हिंगोली जिल्ह्यात 0 ते 6
वयोगटातील 118063 बालकांपैकी एप्रिल 2018 ते जून, 2018 या कालावधीत 106995 (91%) व
द्वितीय तपासणीमध्ये 71420 (60 %) बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून संदर्भ
सेवेकरीता 966 संदर्भित करण्यात आले व
तसेच 6 ते 18 वयोगटातील शाळास्तरावरील विद्यार्थ्यांची माहे जुलै ते डिसेंबर 2018
या कालावधीमध्ये एकूण 212318 पैकी 121759
(57%) आरोग्य तपासणी करण्यात आली व संदर्भ
सेवेकरीता 2322 संदर्भित करण्यात आले.
सदरील बालकांना दर शुक्रवारला जिल्हा
किंवा ग्रामीण रुग्णालयस्तरावर संदर्भसेवा
देण्यात येत आहेत. संदर्भ सेवा
दरम्यान डिसेंबर 2018 अखेर पर्यंत ऱ्ह्रदयशस्त्रक्रिया 34 लाभार्थ्यांवर तर
अस्थिव्यंगच्या 23, हरणीया 14, हायड्रोसील 4, कान- नाक- घसा- 28 आणि इतर
आजाराच्या 130 अशा एकुण 233 शास्त्रक्रीया
करण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment