त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.08: माहे जानेवारी
2019 या महिन्याच्या मासिक वेतन देयके दाखल करताना सर्व शासकीय / निमशासकीय
कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीचे
माहे डिसेंबर-2018 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 जानेवारी, 2019 पर्यंत
भरावयाचे आहे.
तसेच या
कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.in वरुन ऑनलाईन ई आर
1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व
इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत
युजर आय.डी. व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी
आपले ई-मेल आयडी, फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपले प्रोफाईल अपडेट
करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी
कळविले आहे .
****
No comments:
Post a Comment