11 January, 2019

जिल्हा कोषागार कार्यालयाचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन




जिल्हा कोषागार कार्यालयाचे
अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

       हिंगोली, दि. 11: जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी पार पडणार आहे.
            या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्यांक, विकास व वक्फ राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे,गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवराणी नरवाडे, लोकसभा सदस्य राजीव सातव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
            तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार रामराव वडकुते, विक्रम काळे, सतिश चव्हाण,विप्लव बाजोरीया, विधान सभेचे सदस्य  डॉ. जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे,  नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, प्रधान सचिव लेखा व कोषागारे वित्त विभाग नितीन गद्रे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यैकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांची उपस्थिती राहणार आहे.

****

No comments: