अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र पडताळणी करुन
घेण्याचे आवाहन
हिंगोली, दि.23: सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद
कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड,
लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील सन 2019-20 या
शैक्षणिक वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमास, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक
विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसुचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणीकरीता
प्रस्ताव दिनांक 24 जानेवारी ते 15 मार्च, 2019 पर्यंत या समिती कार्यालयात सादर
करावे.
त्या अनुषंगाने या
विभागातील विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांच्या
प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पुर्ण व्हावी. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाण्पत्र तपासणीच्या
प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा.
विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात
कोणत्याही प्रकारची त्रुटी/चुक किंवा अपूर्णता राहू नये, याची दक्षता घेण्यात यावी
असे आवाहन सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment