सुशिक्षित
बेरोजगारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली, दि.21: सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन
देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्या विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, हिंगोली व नगर परिषद, वसमत
यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत
दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यास एकूण चार
उद्योजक येणार असून, यात मेसन, बार
बेंडींग, वेल्डींग, हॉस्पीटॅलिटी, प्लंबिंग, ॲप्रेंटिस, ट्रेनी, फिल्ड ऑफिसर,
सेल्स एक्सिक्युटीव्ह या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्यात
सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या
वेबपोर्टलवर एम्पॉयमेंट या पर्यायावर क्लिक करुन नोकरी साधक हा पर्याय निवडावा,
युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग इन करुन प्रोफाईल मधील पंडीत दिनदयाळ उपाध्याय
रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे. या रोजगार
मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता मंगळवार मैदान,
नगर परिषद कार्यालयाजवळ, वसमत, जि. हिंगोली येथे करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रताधारक
शिक्षित उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो, सेवा योजनकार्ड
घेऊन वरील पत्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी 02456- 224574
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र , हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment