सिंचन विहिरीतील गौण
खनिज वाहतूक व विक्री करीता परवाना आवश्यक
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली, दि.5: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहीरींचे
कामे झालेली आहेत. तसेच काही प्रमाणात प्रगती पथावर आहेत. आणि त्यामधून मोठ्या
प्रमाणात गौण खनिज उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, रोहयो प्रभाग
यांचे शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2018 अन्वये शेतकऱ्यांच्या शेतातील पाणंद
रस्ते हे प्रामुख्याने शेतामधील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण
करण्याकरिता उपयोगात येतात. अशा ठिकाणी ने आण करण्यासाठी शेत, पाणंद रस्त्यांची
आवश्यकता असल्यामुळे सदर ठिकाणी सदर गौण खनिजाचा वापर जल सिंचन विहीर व जलयुक्त
शिवार अभियाना अंतर्गत कामातुन उपलब्ध झालेले गौण खनिज शेतरस्ता, पाणंद रस्ता
बांधकामासाठी उपयोग करीत असल्यास अशा गौण खनिजाकरीता कोणत्याही प्रकारचे स्वामीत्व
शुल्क न आकारता सदरचे गौण खनिज वापरण्याची
परवानगी देण्याबाबतचे निर्देश आहेत. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 12
जानेवारी, 2018 अन्वये नळमार्ग किंवा केबल टाकण्याकरिता जमीन खोदल्यावर त्या
खोदकामातून उपलब्ध होणारी माती त्याच ठिकाणी भराव टाकण्यासाठी व समतल करण्यासाठी
वापरण्यात येत असल्यास अशा मातीवर स्वामित्व धन भरणे आवश्यक असणार नाही. तसेच
महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 11 मे, 2015 अन्वये उपविभाग, तहसिल अंतर्गत सिंचन
विहीरीतून निघालेला दगड, मुरुम , माती याचा संबंधित शेतकऱ्यांना स्वत:च्याच
शेतामध्ये ज्या जमिनीच्या गट नंबरच्या ठिकाणी विहीरीचे खोदकाम केलेले आहे व
त्यांना त्याच जमिनीच्या गट नंबरमध्ये गौण खनिजाचा वापर करावयाचा असल्यास जसे की,
गोण खनिज बंधाऱ्यावर टाकणे, जमिनीचा भराव करणे यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून
कोणत्याही प्रकारे स्वामित्वधन वसूल करण्यात येणार नाही, परंतू संबंधित शेतकरी
यांना सिंचन विहिरीचा निघालेल्या गौण खनिजाची इतरत्र ठिकाणी वाहतुक करावयाची
असल्यास किंवा विक्री करावयाची असल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून नियमानुसार विहित
नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात सादर करुन स्वामित्वधन शासन जमा करुन
तात्पुरत्या गौण खनिज परवाना हस्तगत करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment