स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत 10 फेब्रुवारी रोजी
मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 07 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच
आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्या
अनुषंगाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत दि. 30 जानेवारी ते 13
फेब्रुवारी, 2023 या पंधरवाड्यात विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत हिंगोली शहरात दि. 10
फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा मुले व मुलीसाठी खुली राहील. या स्पर्धेचा मार्ग शिवाजी महाराज
पुतळा-इंदिरा गांधी चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-जिल्हा परिषद ते जिल्हा परिषद शाळा
असा राहील. मॅरेथॉन स्पर्धेतून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक काढून त्यांना
अनुक्रमे प्रत्येकी 4 हजार, अडीच हजार, 1 हजार पाचशे रुपये बक्षीस , ट्रॉफी व
प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. हे बक्षीस मुले व मुलीसाठी वेगवेगळी असतील.
या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी एम.
जी. पवार (मो. 7083362842), डॉ.करिश्मा जाधव (मो.7767897982) यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment