हिंगोली येथील रोजगार मेळाव्यात 483
बेरोजगार उमेदवारांची केली प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज
येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात
जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 715
उमेदवार उपस्थित होते. यापैकी 483 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यात युवाशक्ती
स्कील इंडिया प्रा.लि.पुणे (महिंद्रा ॲन्ड महिंद्रा पुणे, एन्डयुरन्स औरंगाबाद),
धूत द्रान्समिशन औरंगाबाद, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, आर्मस
इ.प्रा.लि. वाळूज औरंगाबाद, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस
प्रा.लि.पुणे, बन्सल कोचिंग क्लासेस, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, रक्षा
सिक्युरिटी फोर्स हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स
हिंगोली, क्लॉउड इंम्पॅक्ट, हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक
उपस्थित होते .
*****
No comments:
Post a Comment