जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 11 : संपूर्ण राज्यामध्ये 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक
युनानी दिवस करण्यात येतो, त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करुन जागतिक युनानी
दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी उपस्थितांना जागतिक युनानी दिवसाबद्दल
मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय एम एस युनानी डॉ.रहमत तुला खा यांनी डॉ.हकीम अजमल
खान यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येत असून त्यांच्या
भूमिका व योगदान, युनानी उच्चाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश
टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण लांजेवार, प्रशासकीय अधिकारी
डॉ.प्रताप चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, बालरोग तज्ञ डॉ. दीपक
मोरे, डॉ.पुंडगे, डॉ. विठ्ठल करपे, डॉ. इनायतुल्ला खान, डॉ. फैजल खान, डॉ. विद्या देवकते, डॉ.
दीपक मोरे, डॉ. घोषणा कोराम, आशा क्षीरसागर, गणेश सोळुंके, सुनील जाधव, तसेच
नर्सिंग कॉलेजचे
विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विद्या देवकते, डॉ. दीपक
मोरे, भातुलकर , रेखा टेकाळे यांनी परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment