वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे ग्राम बाल संरक्षण समितीची
बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 28 : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची
बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समिती रचना व कार्यपध्दती विषयी तसेच ग्राम बाल
संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून
निवड करण्यात यावी याविषयी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रबाह्य कार्यकर्ता
अनिरुध्द घनसावंत यांनी माहिती दिली.
तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, बाल विवाह
प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय
18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे
विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त
मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम याविषयी माहिती
दिली. तसेच बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या
अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या
कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी
शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्याची नोंद करुन ग्राम सेवक
तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे
ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन
आहे का ? याची शहानिशा करण्याबाबत माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक
कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली.
या बैठकीस ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व गावातील ग्रामस्थ
उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment