मुख्यमंत्री
कृषि सिंचन योजनेंतर्गत
वैयक्तीक
शेततळे घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत
वैयक्तीक शेततळे या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
स्वीकृती सुरु आहे. यात 15x15x3 ते 34x34x3 मीटर शेततळ्याच्या एकूण आठ
आकारमानासाठी रक्कम 14 हजार 443 रुपये ते कमाल 75 हजार रुपये अनुदान देय आहे. अर्ज
केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात येत आहे.
महा डीबीटी पोर्टलवर
शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी केलेले जुने अर्ज रद्द करुन मुख्यमंत्री शाश्वत कृषि
सिंचन योजना अंतर्गत वैयक्तीक शेततळे या बाबीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/
या लिंकवर लॉगिन करुन अर्ज करणे आवश्यक आहे. वरील लिंकवर अर्ज करा या पर्यायावर
क्लिक करा- सिंचन सुविधा व साधने ही बाब निवडा-वैयक्तीक शेततळे ही बाब निवडा,
इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडा-परिमाण
निवडा (शेततळ्याचा आकार)-स्लोप निवडा-जतन करा-अर्जाचे शुल्क ऑनलाईन अदा करा
याप्रमाणे माहिती भरावी.
जास्तीत जास्त इच्छूक
शेतकरी बांधवांनी वैयक्तीक शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत,
असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
शिवराज घोरपडे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment