02 February, 2023

 

एमसीईडी हिंगोली तर्फे फ्रेंचायसी देण्यासाठी उद्या एक दिवसीय शिबीराचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद ही संस्था उद्योग संचालनालय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्त्याखाली काम करते. समाजात उद्योजकतेचे वातावरण तसेच बेरोजगारीचे निर्मूलन करण्यासाठी विविध विषयावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते. संस्थेचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने संस्थेनी फ्रेंचायसी देण्याचे ठरविले आहे. सध्या तरी सात ट्रेड आहेत. मागणीनुसार ट्रेड ठरविण्यात येणार आहेत.

सध्या ब्युटी पार्लर, फॅशन डीझायनिंग, संगणक / लॅपटॉप दुरुस्ती व देखभाल, फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींग, फूड प्रोसेसिंग, दुचाकी वाहन दुरुस्ती तसेच मोबाईल दुरुस्ती याचे प्रशिक्षण देण्यासाठी  हिंगोली जिल्ह्यात फ्रेंचायसी देण्यात येत आहे.

वर दिलेल्या सात ट्रेडच्या दुकानाचे अथवा संस्थेचे मालक यांनीच शिबिराला यावे. प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी येऊ नये. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले कमीत कमी वर्षाला 3 लाख रुपये कसे कमवावे आणि जास्तीत कसे कमवता येतील याचे मागदर्शन किशोर अंभोरे, विभागीय अधिकारी, नांदेड तसेच मुख्य कार्यालय औरंगाबाद करणार आहेत. तसेच एमसीईडी, फ्रेंचायसीद्वारे वरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणाचे संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. मी या विषयात पारंगत आहे" हे दाखविण्यासाठी. कर्ज घेताना तसेच व्यवसायाच्या ठिकाणी फोटो लावता येऊ शकते. सोबत उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे शासनाच्या कर्ज योजना व सवलती तसेच हिशोब कसा ठेवावा, प्रेरणा, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा याविषयी माहिती देण्यात येणार आहे . अधिक माहितीसाठी शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा.

उद्या दिनांक 3 फेब्रुवारी, 2023 रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह, सरकारी दवाखान्या मागे, हिंगोली येथे सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन किशोर अंभोरे, विभागीय अधिकारी, नांदेड तसेच मुख्य कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.

**** 

No comments: