जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत
बालविवाह प्रतिबंध कायदा व
महिला सबलीकरणाविषयी येळी येथे
जनजागृती
हिंगोली (जिमाका),
दि. 13 :
येथील आदर्श महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर हिंगोली
तालुक्यातील येळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये संपन्न होत आहे. या शिबीरामध्ये
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल
संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 व महिला सबलीकरण या विषयी जनजागृती
कार्यक्रम घेण्यात आला.
या
कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी महिला सबलीकरण व बाल
विवाह निर्मुलन, बाल विवाहाचे दुष्परिणाम या बाबत माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक
अधिनियम,2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित
आहे. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या
अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी
यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्तरावर
ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असुन या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व
सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहे. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार
नाही याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी. तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची
21 वर्ष पुर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले,
समुपदेशक
सचिन पठाडे यांनी महाराष्ट्रातील बाल विवाहाचे प्रमाण आणि जिल्ह्याची स्थिती या बाबत
पीपीटीच्या माध्यमातुन सादरीकरण केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी
बाल विवाह प्रतिबंध या विषयावर पथ नाट्य सादर केले,
जिल्ह्यातील
कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्या बाबतची माहिती मिळताच चाईल्ड लाईन टोल फ्री
क्रमांक 1098 किंवा पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 यावर माहिती देण्याबाबत उपस्थित गावकऱ्यांना
आवाहन केले.
कार्यक्रमाच्या
शेवटी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह
प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती
कोरडे, समुपदेशक सचिन पठाडे
तसेच आदर्श महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा
योजना शिबीराचे संचालक प्रा.डॉ. सोनलकुमार नगरकर, आदर्श महिला महाविद्यालय प्रभारी प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी
प्रा.डॉ.महेश मंगनाळे, रासेयो
कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सचिन हाटकर, क.म. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेश वऱ्हाड, प्रा.बी.टी.राठोड,
प्रा. सपना पुप्पलवाड, प्रा. जाधव मॅडम, रासेयो शिबीरार्थी विद्यार्थी व सर्व गावकरी
महिला मंडळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment