ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 मध्ये निवडून आलेल्या
विजयी उमेदवारांनी जाहीर प्रगटन सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्ह्यातील
सन 2022-23 या वर्षात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 मध्ये विजयी झालेल्या
अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, आणि विशेष मागास
प्रवर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समिती हिंगोली या समिती कार्यालयात जात प्रमाणपत्र वैधतेसाठी
प्रस्ताव सादर केलेले आहेत. अशा विजयी उमेदवारांना आपले सदस्यत्व अबाधित
ठेवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विजयी उमेदवारांनी
आपण विजयी झाल्याचे (निवडून आल्याचे जाहीर प्रगटन) या समिती कार्यालयास सादर करणे
आवश्यक आहे.
त्यामुळे समांतर आरक्षणाच्या जागेवर निवडून
आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी निवडून आल्याचे जाहीर प्रगटन तसेच आपल्या जात
प्रवर्गासाठी आवश्यक असलेले जात नोंद पुरावे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
हिंगोली या कार्यालयास तात्काळ सादर करुन प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी
समितीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त
तथा सदस्य उमेश सोनवणे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment