निवृत्ती
वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी
हयातीचे
प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका),
दि. 08 : महाराष्ट्र
कोषागार नियम 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना
दरवर्षी दि. 01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला
सादर करणे आवश्यक आहे. संबंधित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ज्या बँकेतून
निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँकेमार्फत हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात सादर
केला जातो. परंतु बऱ्याच प्रमाणात निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयात
प्रमाणपत्र कोषागारात दाखल केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
हिंगोली
जिल्ह्यातील ज्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचा दाखला अद्याप
सादर केला नाही त्यांनी हयात प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे दाखल
करावे, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment