"आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023" च्या अनुषंगाने
28
फेब्रुवारी रोजी तृणधान्य प्रभात फेरीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : "आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023" या
संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी " इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या
उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या
आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
"आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्ष 2023" साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने "विशेष महिना म्हणुन महाराष्ट्र
राज्यासाठी फेब्रुवारी-2023 हा महिना नेमून दिलेला असल्याने या महिन्यात या
तृणधान्य पिकांची जास्तीत जास्त प्रसिध्दी
करावयाची आहे. त्याचबरोबर "पोष्टिक तृणधान्य विशेष माहिना (मिलेट ऑफ द मंथ)"
या संकल्पनेअंतर्गत फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याने ज्वारी
पिकाच्या प्रचार व प्रसिध्दीवर विशेष भर द्यावयाचा आहे. पौष्टिक तृणधान्य पिकातील
पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जन
सामान्याच्या लक्षात येण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता
जिल्हा परीषद शाळा येथुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रभात फेरीचा मार्ग जिल्हा परिषद
शाळा- पिपल्स बँक-आखरे मेडिकल पॉईट-जवाहर रोड-गांधी चौक-इंदिरा गांधी चौक असा आहे.
या प्रभात फेरीचा समारोप अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील
महत्व या विषयावरील डॉ.संजय घुगे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
या प्रभात फेरीमध्ये जिल्ह्यातील
जास्तीत जास्त शेतकरी, विविध शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये यांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली
यांनी केले आहे
****
No comments:
Post a Comment