एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी प्रतिक्षा यादीतील 48 विद्यार्थ्यांची निवड
महाज्योतीने घेतली विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल
हिंगोली (जिमाका), दि. 08 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) , नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकूण 1500 विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा रिक्त होत्या. या रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्याकडे मागणी केली होती.
महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्यासाठी गुणांनुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना असून महाज्योतीने न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे, अशी माहिती नागपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment